Quotes by Pranav bhosale in Bitesapp read free

Pranav bhosale

Pranav bhosale Matrubharti Verified

@pranavbhosale.335746
(48)

परमेश्वराचा मित्र होण्याचा मार्ग...!

उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले असतात, ऐन लग्न तिथी चालू असतात. तशाच एका दिवशी एक लहान मुलगा भर उन्हामध्ये फुलांचे गजरे विकत असतो. येणारे जाणारे लोक त्याच्याकडून मोलभाव करून गजरे पण घेत असतात पण कोणाचे लक्ष त्याच्या पायाकडे जात नसते. एवढ्या भर उन्हात अनवाणीच तो लहान मुलगा गजरे विकत असतो. इतक्यात तिथून एक मनुष्य जात असतो अन त्याच्या नजरेस हे दृश्य पडते. तो लगेच पळत जाऊन एक शुज जोडी घेऊन त्या मुलापाशी येतो आणि त्याला तो शुज घालायला देतो.
मुलगा शुज घालतो अन त्या काकांना बोलतो तुम्ही परमेश्वर आहात काय ? यावर तो मनुष्य बोलतो, नाही रे बाळा..! असे का बोलतोयस? यावर तो लहान मुलगा म्हणतो, तुम्ही परमेश्वर नाहीये तर मग नक्कीच तुम्ही परमेश्वराचे मित्र असणार आहात. आता मात्र तो मनुष्य जरा कुतूहलाने विचारतो, का बर ? त्यावर तो लहान मुलगा उत्तरतो कि, माझे पाय कालपासून खूप भाजत होते आणि मी परमेश्वराला प्रार्थना केली होती मला उद्या शुज मिळू देत. आणि ते तुमच्यारुपी मला मिळाले.
आता मात्र तो मनुष्य भावूक होऊन त्या मुलाचा निरोप घेऊन हळव्या मनाने आणि समाधानाने तिथून निघून जातो. त्याला समजले होते कि परमेश्वराचा मित्र होणे किती सोपे आहे. या निसर्गाचा एक नियम आहे. आपल्याकडे जे आहे ते देऊन पुढे चला नाहीतर ठेऊन पुढे चला. इथून घेऊन जायचा कोणताच मार्ग निसर्गाने ठेवलेला नाहीये

Read More