Quotes by Govind Shende in Bitesapp read free

Govind Shende

Govind Shende

@kisanshende6769


प्रेम करायच राहुन गेलं

तिच्या घरच्यांशी असणारी जवळीक,
प्रेमाच्या आड येऊन बसली.
जीव तिच्यावर जडुन ही,
मनाला मुरड आम्ही घातली.
मन मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं,
आणि प्रेम करायचं राहुन गेलं.

तिचा होकार असताना ही,
तिच्या घरच्यांचा सारा विचार करुन,
तिला नकारचं दिला.
उपकारांच्या ओझ्याखाली,
त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं.
आणि प्रेम करायचं राहुन गेलं.

एक नाते जोडावे की, चार नाती तोडावी..
हे आम्हाला कधी, समजलेच नाही.
झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडणे जमले ही नाही.
फुलण्या आधीच कळ्यांना कोमजताना पाहिलं,
आणि प्रेम करायचं राहुन गेलं.
आणि प्रेम करायचं राहुनचं गेलं.

Read More