Quotes by Dipapooja chavhan in Bitesapp read free

Dipapooja chavhan

Dipapooja chavhan

@dipapoojachavhan.334605


हा कुछ बदल गया है ........
हा कुछ बदल गया है ........
ये बदलाव कम ही आया है लेकीन
हा कुछ बदल गया है ........
अब ना जाने कैसे हसना सिख लिया हैं.....
अकेले मुस्कुराना आ गया है....
हा कुछ बदल गया है ........
कमिया तो हर किसी मे होती हैं
हम मे भी बहोत होगी
पर कमियो को कम करना सीख लिया हैं.....
हा कुछ बदल गया है ........
जहा समय कटना जरा मुश्कील सां था
अब समय का पता कहा चलता हैं
लगता है क्या मुझमे बदलाव आया है...
लेकीन हा कुछ बदल गया है ........
जहा सोच मे पुरा दिन निकल जाता था......
अब सोचना कम कर दिया हैं.....
हा कुछ बदल गया है.....
वो भी एक वक्त था की हर किसी का कहा..
दिलं को लग जाता था.....
पर अब ना जानें दिलं भागने मे कमयाब
हो जाता है
फिर लगता है क्या मुझमे बदलाव आया है.....
लेकीन फिर महसुस होता है.....
हा कुछ बदल गया है ........
जहा फोन देख दिन निकल जाता था
अब समय कहा मिलता हैं
क्या सचमे बदली हू मै
या सिर्फ मुझे ये लगता हैं....
की. हा कुछ बदल गया है ........

Read More

स्पर्श...
बाळ जन्माला आल्यावर त्याला पहिला स्पर्श हा सहसा डॉक्टर चाचं असतो... पण त्या नंतर आई वडील आणि मामा हे लोक त्या मध्ये असतात...
माझ्या मते त्या बाळाला कळत नसेल पण मायेची ऊब त्याला कळते....
त्याला जाणीव असतेच की हे आपण जाणतो.... त्याला लहानगा म्हणून सगळे जवळ करतात.... त्याचा लाड पुरवतात...... त्या लाडातच ते बाळ वाढू लागतं......आणि मग काय.....ते रमून जात त्याला घेणारा प्रत्येक व्यक्ती हा त्याला आपलासा होतो..... त्याच्या जगातला तो रहिवासी होतो....पण तेच शेजारी पुरुष किंवा मुलगा शेजरी किंवा दूरचे नातेवाईक बहुतेक वेळा लाड करायला घेतात ....
बहुतांश हे चांगले पण असतात.... पण काही वेळेला तो लाड कधी वाईट स्पर्शात बदलतो हे स्पर्श करणाऱ्याला कळत ही नाही ....
आणि तो स्पर्श त्या निरागस बालकाने समजावा अशी तर कल्पना ही चुकीची ठरेल... नाही का??
कधी कसं त्या बाळाला वाईट स्पर्श होते ते कोणालाच कळत नाही ..... पण एक समजदार म्हणून किती योग्य...??
त्याचा परिणाम पाहिलंय का कधी भीती अनुभवलाय का कधी......
हे घडू च नये असं तर शक्य नाहीये कारण किती लोकांना तुम्ही थांबवणार ना....
पण आई बाबा आणि जवळचे पालक म्हणून हे आपण नक्की टाळू शकतो.....
मुलांना सहसा खूप वेळ दुसऱ्या सोबत सोडू च नका ना काय बिघडेल तो किंवा ती तुम्हाला त्रास च देईल ... काम करू देणार नाही इतकंच ना....
पण त्याच्या सोबत होणाऱ्या वाईट स्पर्शा मुळे त्याला किती महिने वा वर्ष भितीत घालवावे लागणार ह्याची जाणीव महत्वाची.....
ह्याचा अर्थ सगळेच वाईट आहे शेजारी मामा काका अस मला अजिबात म्हणायचं नाहीये.....
पण सगळे च चांगले असतील अस ही मी म्हणणार नाही......
आज काल तो good touch bad touch cha Trend आला आहे म्हणे, कुठे मिळतो हो विकत किती लां असतो....
ही आहे खरी बकवास खरा मूर्खपणा.....
त्या मुलांना इतक्या कमी वयात काय सांगताय कळत का....
अरे जर त्याला ह्या गोष्टी बालपणात सांगितल्या त्याच्या भावना सगळ्यासाठी च तश्या च होतील हे का नाही कळत लोकांना घाबरेल ते निरागस पोरं
थोडीशी काळजी आपण का घेत नाही ...
मग म्हणे की आपण काय सगळीकडे सोबत असतो का म्हणून सांगावं लागते ना good and bad touch
म्हणे शाळेत एकटे असतात.......
हे त्या पेक्षा मोठा मूर्ख पणा शाळेत शिकणारी हजारो पोर असतात.... त्यात अश्या गोष्टी खूप च कमी असतात की शाळेत अस काही झाले असेल....
बाहेर जाताना त्याला एकटे राहील्यापेक्षा सगळ्यांसोबत कसं राहता येईल हे शिकवा.....
त्याला एकत्र कसं राहायचं हे शिकवा.....
कुठे जाताना सांगून वा विचारून च जा अस सांगा....
त्याला तुम्ही दाखवलं ते च जग माहित असत त्याच्या साठी तुम्ही दाखवलेले प्रेमळ लोक च जगभर दिसतात......
मग स्पर्श कळावा हा प्रश्न च येत नाही......
परवा एक छोट्या मुलीच्या शेजाऱ्यांनी तिची पप्पी घेताना ही ओठा वर कशी आली ते का थांबलं नाही हे कळलंच नाही ......
बर माझी मुलगी कुठे आहे हा प्रश्न एकदाही तिच्या आई ला पडू नये का?? .....
खेळत आहे पण एकदा तिला पाहून यावे असे वाटू नये का??.......
स्पर्श हा फक्त सांगून जाणवत नाही ना .! हे कधी कळेल.... कश्यात ही ट्रेंड शोधण्यात मज्जा नसते. हे का कळू नये.....
By Dipapooja ❤️✍️

Read More

काल वाटेत चालताना एका आजोबांना माझा धक्का लागत लागत राहिला .. तेव्हा आजोबा म्हणाले बाई जरा बघून .. अस पोरीन धक्का मारलेला चांगल नाही वाटत.....
मी हसून उत्तरले आजोबा तुम्ही माझ्या आजोबा बाबा सारखे हो..... लक्ष नव्हत..
त्यांच्या सोबत चार पावलं चालताना ते बोलत होते...
बेटा.....
डोंगर दुःखाचा पचवत समोर चालत होतो....
गरजेपेक्षा जास्त राबत होतो...
घरी भाकर नेता यावी म्हणून झिजत होतो....
लेकर निवांत झोपावी म्हणून जागत होतो....
आत मधून तुटलो तरी बाहेरून सावरत होतो...
जीवनाला धक्का देत गाडी हाकत होतो......
कारभारीन ला धीर देत होतो.....
रडता रडता हसत होतो....
गाडा संसाराचा हाकत होतो....
जेव्हा आली बसून खाण्याची वेळ तेव्हा रस्त्यावर
दिवस काढत होतो...
वाटलं कारभारीन आहेच संगतीला...पण माग पाहिलं एकटाच होतो.....
ती ही गेली टाकून एकट्याला..... तर पोर काय धीर देणार..... तेव्हा ही एकटाच चालत होतो....
आजही एकटाच चालत आहे......
By... DIPAPOOJA ❤️✍️

Read More

तु थकलास तु दमलास
पण नकोस थांबु मध्ये
तु झिजलास तु भिजलास
भिऊ नकोस कुठे.....
तु चाल , चाल आणि चाल
तुझी मंजिल आहेच पुढे.....
तु पड .. ..तु रड ....
विसावा घे मध्ये.....
निघ... उठ, लढ पुन्हा तिथे.....
आहे शक्य सगळे तु प्रयत्न कर पुढे.
तु चाल आहे अडथळे तिथे
तु उठ तु धाव रस्ता दिसेल पुढे.....
तु ठहर तू कर प्रहार तिथे .....
तु ऊठ...... तु धडपड ..
तु ढाल बन तिथे.....
तु ढाल बन तिथे.....

Read More

पोस्टमन
आज अचानक 1980 च्या काळात काम करणारे पोस्टमन काकांची भेट झाली.
त्यांच्या सोबतच्या संवादात काही वेगळच बघायला मिळाले.
काहो पोस्टमन काका आता इंटरनेट मुळे जग जवळ आलंय ना?? पोस्टमन काका हसून उत्तरले.....
50 रुपयाच्या money order मनी ऑर्डर
मी 5 किमी झिजयचो.....
बहिणीचे पत्र भावाला मी वेळेवर द्यायचो.....
पत्राची वाट पाहत माझ्या गाव जमा व्हायचं.....
पत्र वाचून दाखवताना संगतीला मला पण रडवायचे.....
पत्र राहायचे छोटे भावना मात्र मोठ्या.....
शब्द कमी होते.... पण अर्थ मोठे.....
चुकून जेवणाच्या वेळेवर गावात जर आलो....
बिना जेवल्याचे परत कधीच नाही गेलो.....
ताबडतोब कामासाठी वेळेच्या बाहेर पडलो...
लोकांच्या प्रेमापोटी गावोगाव फिरलो......
मोठ्यांसोबत लहानगे माझी वाट पाहत होते....
सायकलच्या घंटी ला सगळेच ओळखत होते....
माझ्या पोशखाला लोक दैवी समजायचे....
पोशाख घालून सायकल वाला आला....
म्हणत गोड बातमी ची वाट पहायचे .....
दूर बसलेल्या आपल्या माणसाचे पत्र आले
तर तुम्ही च वाचून दाखवा म्हणत
भोवती माझ्या घोळखा घालायचे.......😘,

शेवटी काका म्हणाले आता जग जवळ नक्कीच आले..... आपले मात्र दूर गेले.....

Read More