Quotes by Avinash Dighe in Bitesapp read free

Avinash Dighe

Avinash Dighe

@avinashdighe
(132)

पहिल्याच भेटीत काहीतरी खास होतं,
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मनात राहून गेला होतं...

तू नवीन होतीस, तरीही अनोळखी वाटली नाहीस,
जणू कित्येक वर्षांनी माझी जुनी मैत्रीणच भेटली होतीस...

गप्पा तुझ्यासोबत सहज होत गेल्या,
आणि नकळत मनाच्या जवळ येत गेल्या.

त्या एका भेटीत एक गोष्ट मात्र कळली,
तू फक्त माझी होणारी जोडीदार नाहीस...
तर माझ्या आयुष्यात पुन्हा भेटलेली
एक सुंदर, जिवाभावाची मैत्रीण आहेस.

तो पहिला दिवस किती सुंदर होता,
आजही आठवला की चेहऱ्यावर हसू येतं...
आणि आता मनात एकच इच्छा आहे—
तो सुंदर वेळ फक्त पहिल्या भेटीपुरता नको,
तर आयुष्यभर तुझ्यासोबत जगायचा आहे. ❤️

Read More