Quotes by अक्षय राजाराम खापेकर in Bitesapp read free

अक्षय राजाराम खापेकर

अक्षय राजाराम खापेकर Matrubharti Verified

@aksh1196gmail.com020709
(23.5k)

घाव मनाचा.. 😢

विझलो नाहीये अजून मी
अंतरंगी ज्योत तेवत आहे.
शब्द तुझे हवेत विरले जरी
मन पटलावर कोरले आहेत..


फुंकर अजून मारणार किती,
अस्तित्व माझे संपणार नाही..
अनेक वादळे झेललीयत मी
इतक्या लवकर मिटणार नाही..


करून बघ घाव तो एकदाचा
इतक्या सहज हारणार नाही मी..
माझाही मीपण पाहिल्याशिवाय
तुला दूर जाऊ देणार नाही मी..


माझी खरी किंमत कळेल तुला
तेव्हा खुप दुर गेलेला असेल मी..
काय गमावलं विचार करत राहशील
पण सावरायला जवळ नसेल मी..



✍🏻 कवी : श्री. अक्षय खापेकर. ©®
(All copyright reserved)

Read More