####Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
!! श्राद्धाची परंपरा !!
-------------------------------
*कशी सुरु झाली श्राद्धाची परंपरा, सर्वात पहिले कोणी केले होते श्राद्ध?*
जाणुन घेऊ या सविस्तर माहिती.....
श्राद्ध पक्ष संदर्भात विविध धर्म ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठीरला श्राद्ध पक्ष संदर्भात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमानात फार कमी लोकांना माहिती असाव्यात. येथे जाणून घ्या, श्राद्ध पक्ष संदर्भातील काही खास आणि महत्त्वाच्या गोष्टी...
**निमि ऋषींनी सुरु केली श्राद्धाची परंपरा--=
महाभारतानुसार सर्वात पहिले श्राद्धाचा उपदेश महर्षी निमि यांना महातपस्वी अत्री मुनींनी दिला होता. अशा प्रकारे सर्वात पहिले निमि ऋषींनी श्राद्ध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर ऋषीं श्राद्ध करू लागले. हळूहळू चारही वर्णाचे लोक श्राद्धामध्ये पितरांना अन्न देवू लागले. नियमित श्राद्धाचे भोजन करून देवता आणि पितर तृप्त झाले.
**श्राद्धाचे भोजन करून पितरांना झाला होता अजीर्ण रोग--=
श्राद्धाचे वारंवार भोजन करून पितरांना अजीर्ण रोग झाला आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी सांगितले की, श्राद्धाचे अन्न खाऊन-खाऊन आम्हाला अजीर्ण (अपचन) झाले असून आम्हाला यामुळे त्रास होत आहे. आम्हाला या त्रासामधून मुक्त करा.
देवतांचे म्हणणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की, माझ्याजवळ अग्निदेव बसलेले आहेत, हेच तुमचे कल्याण करतील.अग्निदेव देवता आणि पितरांना म्हणाले की, आता श्राद्धामध्ये मीसुद्धा तुमच्यासोबत भोजन करेल. मी सोबत असल्यामुळे तुम्हाला अजीर्ण होणार नाही. हे ऐकून देवता प्रसन्न झाले. यामुळे श्राद्ध करताना सर्वात पहिले अग्नीला भोग दिला जातो.
**सर्वात पहिले पित्याला द्यावे पिंड--=
महाभारतानुसार अग्नीमध्ये हवन केल्यानंतर पितरांसाठी जे पिंडदान केले जाते, त्याला ब्रह्म राक्षसही दुषित करू शकत नाहीत. श्राद्धामध्ये अग्नीदेवाला उपस्थित पाहून राक्षस तेथून पळून जातात. सर्वात पहिले पिता, त्यानंतर पितामह आणि शेवटी प्रपितामह यांना पिंड द्यावे. हाच श्राद्धाचा विधी आहे. प्रत्येक पिंडदान करताना एकचित्त होऊन गायत्री मंत्राचा जप तसेच "सोमय पितृमते स्वाहा"चा उच्चार करावा.
कुळातील पितरांना करा तृप्त--
रजस्वला स्त्रीने श्राद्धाचे भोजन तयार करू नये. तर्पण करताना पिता-पितामह नावांचा स्पष्ट उच्चार करावा. एखाद्या नदीच्या काठावर पितरांचे पिंडदान आणि तर्पण अवश्य करावे.पहिले आपल्या कुळातील पितरांना पाण्याने तृप केल्यानंतर मित्र आणि नातेवाईकांनी तिलांजली द्यावी.
पितरांच्या भक्तीने मनुष्याला पुष्टी, आयु, वीर्य आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. ब्रह्मदेव, पुलत्स्य, वशिष्ठ, पूलह, अंगिरा, क्रतु आणि महर्षी कश्यप हे सात ऋषी महान योगेश्वर आणि पितर मानण्यात आले आहेत. मृत व्यक्ती आपल्या वंशजांकडून पिंडदान प्राप्त करून प्रेतत्वच्या कष्टातून मुक्ती मिळवतात.
महाभारतानुसार श्राद्धामध्ये तीन पिंडाचे विधान आहे. त्यामधील पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे. दुसरे पिंड श्राद्धकर्ताच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे. जे लोक या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर पितरांची सदैव कृपादृष्टी राहते.
- पहिले पिंड पाण्यामध्ये जाते, ते चंद्रदेवाला तृप्त करते आणि चंद्रदेव स्वतः देवता आणि पितरांना तृप्त करतात.
- अशाप्रकारे पत्नी गुरुजनांच्या आज्ञेने दुसरे पिंड ग्रहण करते, यामुळे पितर प्रसन्न होऊन पुत्राची इच्छा असणाऱ्या पुरुषाला पुत्र प्रदान करतात.
- तिसरे पिंड अग्नीमध्ये टाकले जाते, यामुळे पितर तृप्त होऊन व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.*
♨️ ♨️ ♨️ ♨️