Quotes by prachi in Bitesapp read free

prachi

prachi

@prachitayade


ओढ......
श्वास दरवळला जरा
पाऊल स्तब्ध झाले,
का कळेना मलाच मी
अनोळखी आज भासले.

ओळखीच्या वाटा साऱ्या
रंग मनी उधळत गेल्या,
आयुष्याचे गूज माझ्या
हळूच कानी सांगून गेल्या.

कोण जाणे केव्हा कशी
भुरळ हलकी पडते मना,
पहाट ओल्या स्वप्नांची
ओढ जणू लावते जीवा.

Read More