Quotes by Writer Shubham Kanade in Bitesapp read free

Writer Shubham Kanade

Writer Shubham Kanade

@shubhamkanadewriter.
(37)

प्रेम हे...
प्रेम हे गुलाबाच्या फुला सारखं असतं, ते फक्त कोणाएकाचच असतं, त्याच्यावरती म्हणजेच गुलाबावरती भोंगा,मधमाशी आणि फुलपाखरू देखील येते पण ते सर्व मधाच्या आशेनेच त्याच्यावरती येऊन बसतात,दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस हे सर्व त्या फुलांकडे परत त्याच आशेने येतात पण ते फुल तिथे नसतेच,ते फुल कोणादुसऱ्याचेच झालेले असते, पण याच्याशी त्यांना काहीच फरक पडत नाही कारण त्यांना आशा फक्त माधाचीच असते, त्यामुळे ते दुसरे फुल बघतात फक्त मधाच्या आशेने,आधीचे फुल कोणादुसऱ्याचेच झालेले असते,ज्याने ते नेलेले असते त्याची आशा फक्त एव्हढीच असते,सुगंध आणि सुंदरता आणि तेच फुलाला हवे असते त्यामुळे ते फुल खुशीखुशीने त्याच्याकडे निघून जाते असेच प्रेम हे असते....

लेखक
शुभम कानडे

Read More

18 मे 2018 ला माझं पाहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे पुस्तकाचे नाव 'क्लाँथ..'असे आहे हे माझे पाहिले पुस्तक नक्कीच वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल.....
मातृभारतीचे मनःपूर्वक आभार......

Read More

ज्या क्षणी जगायचे होते त्या क्षणी 
जगणे खूप अवघड वाटत होते
पण ज्या क्षणी जगणे अवघड होते
त्या क्षणी मात्र जगणे खूप महत्वाचे 
वाटत होते,,,,,,

लेखक
शुभम कानडे

Read More

जीवनामध्ये जगणे खूप अवघड आहे 
                 पण 
जीवन खूपच सुंदर आहे,,,,,

लेखक
शुभम कानडे

प्रवास एका तासाचा...
आज एक प्रवास होऊन गेला तोही फक्त एक तासाचा पण या प्रवासामध्ये खूप काही शिकण्यासारखं आणि स्वतःच्या मेमरिकार्ड मध्ये साठवून ठेवण्यासारखं खूप काही मिळालं पण सांगायचे तर या एका तासाच्या प्रवासामध्ये इतकं काही मिळालं की या मुळे मी कधीच परिस्तिथी या कारणामुळे दुःखी होणार नाही कारण प्रत्येक परिस्तिथी ही चांगलीच असते फक्त त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा चांगलाच पाहिजे परिस्तिथी ही चांगली किंवा वाईट ही कधीच नसते परिस्तिथी ही प्रत्येकाला प्रत्येकासाठी ही सेम असते आज मला इतकंच सांगायचं आहे की काही माणसं परिस्तिथीच्या इतक्या आहारी जातात की ती जगणेच विसरून देतात पण मला या एका तासाच्या प्रवासामध्ये जीवनामध्ये कस आनंदी राहायचं आणि इतरांना कस आनंदी ठेवायचं हे मात्र समजले आणि जीवन जगत असताना हे खूप महत्त्वाचं आहे कृपया बाहेरून काही घ्यायचं असेल तर काही चांगलंच घ्या 
मी घेतलं ते ही फक्त एका तासाच्या प्रवासात......

लेखक
शुभम कानडे.

Read More

राँगं नंबर.........।।।
आज सकाळी मला एक फोन आला मी इकडून बोलत होतो तो ही तिकडून बोलत होता पण सांगायचे तर मी कोणाशी बोलतोय
हे मलाच माहिती नव्हत खूप साऱ्या गप्पा मारल्या कॉलेज मधील ते रहस्यमय दिवस
आणि शाळेतील त्या आठवणी इथं पर्यंत 
सर्व काही आमचे बोलणे आमच्या गोष्टी रमल्या होत्या मी त्या गोष्टीमध्ये हरवून ही गेलो होतो पण अजून ही मला सजलेले नव्हते की मी कोणाशी बोलतोय हा कोणी मला फोन केला हा कोण असेल हा जो काही 
बोलतोय ते मात्र सर्व काही बरोबरच आहे 
पण कोण बोलतय काहीच समजत नव्हतं
हा नंबर कोणाचा आहे काहीच समजत नव्हतं पण आता कस नाव विचारायचं आता विचारलं तर उगाच दोस्तीत वांदा नको म्हणून मी ही काहीच विचारलं नाही पण आमच्या खूप गप्पा रमल्या होत्या बोलत बोलत हसायचो आणि एका क्षणी डोळ्यातून अश्रू ही यायचे पण खूप काही मनातले बाहेर काढायचो आणि काही मनामध्ये साठवून ही ठेवायचो पण अचानक त्यानेच एका नावाचा उल्लेख केला पण ते नाव माझ्या ओळखीचे ही नव्हते ते एका मुलगीचे नाव होते पण त्या नावाशी माझा काहीच संबंध नव्हता पण ज्या वैक्तीने मला फोन केला होता त्याच्या मते त्या मुलीचा आणि माझा खूपच जवळचा संबंध आहे पण अचानकच त्याने मला विचारलेकी तू हाच आहेस ना मी नाही म्हणालो कारण कारण त्याने जे माझे नाव घेतले होते ते माझे नाव नव्हतेच मग आम्हाला समजल की आम्ही मागास पासून दोघे ही अनोळखी व्यक्तीशी बोलत होतो पण आमच सर्व काही
आयुष्यातल्या त्या शाळेतील आठवणी आणि कॉलेज मधील ते दिवस काही मिळते जुळते होते आणि या फोन कॉल मुळे आता आम्ही 
चांगले मित्र ही झालो होतो पण इतके उशिरा ज्या नंबर विषयी बोलत होतो तो तर रॉगं नंबर निघाला.....

लेखक
शुभम कानडे,

Read More

मला इतरांच्या सुखामध्ये
मला माझं सुख शोधायचंय.....

                            -शुभम कानडे

मला मरणा नंतरही इतरांच्या 
मनामध्ये आठवणीच घरटं
बांधून रहायचय
                                  -शुभम कानडे


-