पडद्याआडचे सूत्रधार

०१ : दूरच्या ग्रहांवरची वारी     एकदा एका ग्रहावरच्या वासीयांनी आपल्यासारखी जीवसृष्टी कुठे आहे का हे शोधण्याचा चंग बांधला. वर्षानुवर्ष केलेली मेहनत आता फळाला येणार होती. त्यांनी खूप अशा उडत्या तबकड्या बनवल्या होत्या, ज्या प्रचंड वेगाने प्रवास करू शकत होत्या. सगळ्या योजना अगदी पद्धतशीर राबवून त्यांनी अवकाशात भरारी घेतली. तसा हा त्यांचा काही पहिला प्रयत्न नव्हता. याआधी देखील त्यांनी खूप ग्रहांच्या वाऱ्या केल्या होत्या. नेपच्यून आणि युरेनस वर त्यांचे तर सतत येणे जाणे होते. जणूकाही त्यांचे ते सुट्ट्