पुनर्मिलन - भाग 29

  • 159
  • 72

यामध्ये मुख्य प्रश्न नयनाचा होता ..तिला काय आणि कसे सांगायचे .?हा मामला ऊमाला एकटीला हाताळता येणे केवळ अशक्य होते .हे मोहनला सांगण्यासाठी ती वारंवार मोहनला फोन लावत होती पण मोहनचा फोन काही केल्या लागतच नव्हता .घरी पोचायच्या आत त्याचा फोन लागणे आवश्यक होते .आणि हे सगळे तत्काळ बोलायला लागणार होते .कारण घरी गेल्यावर नयनासमोर त्याला फोन करता येणे अशक्य होते .मुळात आज घरी गेल्यावर तिलाच नयनाच्या सतरा प्रश्नांना उत्तरे द्यायला लागणार होती .कारण जसजशी नयना मोठी होत गेली होती तसतसा तिचा स्वभाव अतिशय चिकित्सक होत गेला होता .कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याविषयी अनेक प्रश्न विचारायची तिला सवयच होती .तिच्या या प्रश्नांच्या भडिमारात कधीकधी तिची मैत्रीण रितू सुद्धा सापडत असे ..आणि एकदा तिचे