मंदोदरी - भाग 9

***********९*********************           दिवसामागून दिवस जावू लागले होते. विवाहाचा प्रश्न तसाच्या तसाच होता. तशी लंकेतील जनता ही राक्षस प्रजातीची होती. ती विभीषणाला राजा मानत नव्हती. तशी राज्यात अराजकताच निर्माण झाली होती. एक मंदोदरीच होती की जी त्या राक्षस प्रजातीला न्याय देवू शकेल. परंतु तिनं तर स्वतःला कोंडूनच ठेवलं होतं त्या कक्षात. आता आपल्या जीवनाचं काहीच होवू शकत नाही असा विचार करुन.          राज्यात निर्माण झालेली अराजकता. ती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. तसं पाहिल्यास विभीषण राज्यकारभार चांगलाच चालवत होता. परंतु चांगल्या गोष्टी राक्षसप्रजातीला खपत नव्हत्या. शिवाय विभीषणाला राज्यातील लोकांना बरोबर समजाविणंही जमत नव्हतं. त्यातच त्याचेसमोर प्रश्न उपस्थित