इटली .. इटलीत आम्ही प्रथम व्हेनिसला गेलो .व्हेनिस ही दक्षिण इटलीतील व्हेनेटो प्रांताची राजधानी आहे .हे शहर सांस्कृतिक कला आणि व्यापाराचे एक केंद्र आहे .इथे १०० पेक्षा जास्त बेटे आहेत .“कालव्यांचे शहर “म्हणून व्हेनिस ओळखले जाते .संपूर्ण शहर कालव्यांच्या आसपास वसल्याने इथले वाहतुकीचे मध्यम फक्त बोटी आहेत .लांबलचक बोटीतून शहराचा सर्व व्यवहार आणि इकडे तिकडे येणेजाणे चालते .या बोटींना “गंडोला” असे संबोधले जाते .गंडोला राईड मधुन पर्यटकांना सर्व शहरभर फिरवले जाते .व्हेनिस म्हणले की सर्वप्रथम आठवते ते THE GREAT GAMBLAR चित्रपटातील झीनत आणि अमिताभ वर चित्रित केलेले ..दो लब्जो की है दिल की कहानी हे गाणे ..गंडोला राईड करताना त्यामध्ये हेच गाणे