पुण्याहून पेपर देऊन परत येताना आमच्या गाडीचं टायर अचानक पंक्चर झालं. आजारी आईमुळे वर्षा एकटीच माझ्यासोबत होती. मी टायर बदलायला खाली उतरलो, आणि ती गाडीतून उतरून माझ्याकडे पाहत उभी होती.पावसाची हलकीशी सर वातावरणात थोडीशी थंडी आणत होती. मी टायर बदलून झाल्यावर आम्ही जवळच्याच एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो जेवायला. तिथे लाईट गेले होते, म्हणून हॉटेलवाल्याने मेणबत्ती लावली. हॉटेलचं वातावरण काहीतरी जादूई झालं होतं.त्या छोट्याशा खोलीत मंद प्रकाशात मेणबत्त्या लुकलुकत होत्या. खिडकीबाहेर हलका पाऊस सुरू होता, आणि त्या शांततेला भेदत एक जुनं, सोज्वळ गाणं स्पीकरवर वाजत होतं — "लग जा गले..."हे गाणं वर्षाला फार आवडतं, हे मला माहित होतं. ती डोळे मिटून ऐकत