मला स्पेस हवी पर्व २ भाग १५

  • 2.1k
  • 1.4k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १५मागील भागात सुधीर आणि नेहा यांचा हळुवार प्रसंग बघीतला आता पुढे बघू.त्यादिवशी नेहाला भेटल्यावर छकुच्या मनात बरेच विचार यायला लागले. नेहा पहिल्या भेटीत छकुला आवडली. नेहा शांत आणि समजूतदार वाटली. ती ज्या पद्धतीने तिच्या असिस्टंटशी बोलत होती त्यावरून आणि नंतर ती छकुशी जशी बोलली त्यावरून छकुला ती खूप मॅच्युअर मुलगी वाटली.इतकी छान शांत मुलगी तिच्या प्रेमात रमणच काय कोणीही पडू शकतो असं छकूला वाटलं. रमणला हिने दाद दिली नाही याचंही छकुला कौतुक वाटलं कारण ज्या माणसाच्या रुबाबदार देखण्या व्यक्तीमत्वाकडे बघून मुली त्याच्या प्रेमात पडतात आणि त्याच्यासाठी सगळं सोडायला तयार होतात त्याच रुबाबदार आणि देखण्या