किमयागार - 18

  • 2.7k
  • 1.5k

त्याने आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचा बराच भाग ' परीस ' शोधण्यात घालवला होता.त्याने जगातील मोठ्या वाचनालयात अलकेमीची पुस्तके वाचली होती, विकत घेतली होती. त्यातून त्याला कळले होते की, एक अरब अल्केमिस्ट , जो दोनशे वर्षांचा होता त्याला परीस मिळाला होता. अरबस्तानात जाऊन आलेल्या एका मित्राने सांगितले की , अल फायोम वाळवंटात एक अरब आहे, तो कोणत्याही धातूपासून सोने बनवतो तो दोनशे वर्षांचा आहे असे म्हणतात.हे ऐकून इंग्रजाचा उत्साह अनावर झाला. त्याने आपली सर्व कामे थांबवली व काही पुस्तके घेऊन निघाला आणि तो आता या गोदामात पोहोचला होता.बाहेर एक मोठा तांडा आला होता आणि तो वाळवंट पार करून जाणार होता व