किमयागार - 9

  • 3.6k
  • 2.2k

मुलगा काही तरी बोलणार इतक्यात तिथे एक फुलपाखरू आले आणि दोघां मध्ये फिरू लागले. मुलाला आठवले की फुलपाखरू शुभ शकुन दर्शवणारे असते असे त्याचे आजोबा म्हणाले होते. तसेच तीन पातींच्या गवतामध्ये चार पाती गवत मिळणे व पाली याही शुभ शकुन दर्शवणारे आहेत असे त्यांनी सांगितले होते.त्याच्या मनातील विचार ओळखत म्हातारा म्हणाला तुझे आजोबा बरोबर सांगत होते हे शुभ शकुन आहेत. त्याचवेळी म्हाताऱ्याने आपला कोट बाजूला केला आणि मुलाचे डोळे त्याला जे दिसले त्यामुळे दिपले. म्हाताऱ्याने सोन्याचे जड कवच घातले होते व त्यावर मौल्यवान खडे व रत्ने होती. म्हणजे म्हातारा खरंच राजा होता व चोरांपासून वाचण्यासाठी त्याने हा पेहराव केला होता.