गीत रामायणा वरील विवेचन - 23 - माता न तू वैरीणी

  • 2.9k
  • 1.2k

दशरथ राजाचा मृतदेह रसायनात ठेवण्यात आला. तातडीने वसिष्ठ ऋषींना बोलावण्यात आले. वसिष्ठ ऋषींनी भरत व शत्रुघ्न ला आणण्यासाठी त्यांच्या आजोळी म्हणजे नंदीग्रामी दूत पाठवले. प्रवासात भरतास दशरथ राजाच्या मृत्यूची तसेच श्रीरामाच्या वनवासाची माहिती सांगू नये असे दूतास बजावण्यात आले होते त्यामुळे भरतास वाटले की नक्की श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि म्हणूनच आपल्याला घाईघाईने आयोध्येस नेण्यात येत आहे. प्रवासात भरत व शत्रुघ्न ह्याच समजात असतात त्यामुळे आनंदी असतात परंतु जसे ते अयोध्येत पोंचतात तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात कारण अयोध्येला शोककळा आलेली असते. कुठेच दिवे लागले नसतात. कुठेच अग्नी प्रज्वलित झालेला नसतो. दूतास पृच्छा केली असता दूत काही न सांगता मौन