शिकण्यासाठी मी व माझी मैत्रीण श्वेता गावातून शहरात आलो होतो, तिथे एक खोली आम्ही भाड्याने घेतली आणि राहू लागलो आमचं कॉलेज नियमितपणे सुरू झालं. आमची खोली घरमालकाच्या घरापासून थोड्या अंतरावर एका बाजूला होती,त्या खोलीला लागूनच एक मोठ्ठी विहीर होती. त्या विहिरीला ग्रील चं झाकण होतं. रात्री आम्ही लवकर झोपून जायचो आणि सकाळी उठून अभ्यास करायचो. दिवसा बऱ्याच वेळा आम्ही त्या विहिरीच्या कठड्यावर बसून अभ्यास करायचो. आमच्या मैत्रिणी बरेचदा आमच्या रूम वर येत असत तेव्हा त्या विहिरीच्या कठड्यावर बसूनच आम्ही गप्पा मारत असू. एकदा अशाच दोन मैत्रिणी आमच्या कडे अभ्यासासाठी आल्या होत्या कारण दुसऱ्यादिवशी कॉलेज ची परीक्षा होती. त्यातली एक मैत्रीण