रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 55

  • 2.6k
  • 867

अध्याय 55 निमिराजाला वसिष्ठांचा शाप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिलें प्रसंगीं नृगकथन । श्रीरामें लक्ष्मणासि सांगोन ।पुढें लक्ष्मण कर जोडून । अभिवंदन करिता झाला ॥१॥स्वामींनीं कथा सांगतां । तृप्ति नव्हे माझिया चित्ता ।आश्चर्य वाटे धरणिजाकांता । पुनरपि कथा ऐकावी ॥२॥ऐसें लक्ष्मणाचें देखोनि आर्त । पुनरपि जनकजामात ।कथा सांगावया उपक्रम करित । त्वरित श्रीराम ॥३॥पूर्वी राजा इक्ष्वाकुनंदन । तयाचा सुत निमि जाण ।अति धर्मिष्ठ प्रजापाळण । बरवेवरी करितसे ॥४॥तयासि झाले बारा पुत्र । तेही पितयासारखे पवित्र ।तयांमध्ये कनिष्ठ गुणवंत । पित्या आवडत बहुसाळ ॥५॥निमि राजा धर्मपरायण । अति पराक्रमी पुरुषार्थी जाण ।अमरपुरीसारिखें पाटन । पुत्राकारणें करुं पाहे ॥६॥पुत्र वसावयालागून । गौतमाश्रमासमीप