रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 48

  • 2.7k
  • 1k

अध्याय 48 सीतेचा आक्रोश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाचे निष्ठुर वचन । ऎकोनि जानकी खेदें खिन्न ।थोर विषाद पावोन । मूर्छागत पैं झाली ॥१॥सुकुमार जैसी कर्पूरजननी । अनिळ झगटें येवोनी ।मग ती डोले हादरोनी । तैसें अवनिजेसि जाहलें ॥२॥ते पडे धरणीं मूर्छागत । भ्रमें व्याकुळ झालें चित्त ।क्षण एक होवोनि सावचित्त । लक्ष्मणा बोले दीन वचनें ॥३॥जनकात्मजा म्हणे सुमित्रासुता । माझें शरीर दुःखाते तत्वतां ।ऎसें जाणोनि कीं विधाता । दुःखासी पात्र मज केलें ॥४॥पूर्वी जैसें आपण केलें । कोणां स्त्रीपुरूषां असे विघडलें ।तरी मज हें प्राप्त झालें । वनवासासी सांडीलें श्रीरामें ॥५॥ऎसा जाणोनियां वृत्तांत । वनी मज त्यागी श्रीरघुनाथ ।माझे