रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 41

  • 2.4k
  • 846

अध्याय 41 भरतकृत श्रीरामस्तुती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गेले ऋक्ष राक्षस वानर । मागें बंधूंसहित श्रीरघुवीर ।बसले असती सुखें अपार । आनंदें निर्भर ते समयीं ॥१॥तेव्हां माध्यान्हकाळ प्रवर्तला । स्नानसंध्या विधी सर्व केला ।भोजन सारोनि ऋषि सकळां । बंधूंसहित राघवें ॥२॥तंव अकस्मात मधुर वाणी । आकाशींहूनि श्रीरामश्रवणीं ।पडली तये सभास्थानी । पाहें गगनीं मज श्रीरामा ॥३॥ कुबेराचे पुष्पक विमान पुनः श्रीरामांजवळ त्यांच्या सेवेसाठी आले : कृपेंकरोनि राघवा । मज पाहें कृपार्णवा ।मी पुष्पक कैलासाहूनि देवा । धनेशें मज पाठविलें ॥४॥बोलिलें मंजुळ उत्तरें । तें अवधारावें राजीवनेत्रें ।म्हणे पुष्पकावरी श्रीरामचंद्रें । पूर्वी आरोहण पैं केलें ॥५॥मी तुझे आज्ञेनें रघुपती । गेलों