रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 26

  • 2.2k
  • 768

अध्याय 26 यम व ब्रह्मदेव यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिले प्रसंगीं पाशुपतास्त्र । रावणें सोडून भस्मीभूत ।यमराजसैन्या केला अंत । तेणें हर्षें गर्जत राक्षस ॥१॥विजयो पावला दशानन । म्हणोनि करिती गर्जन ।तें वैवस्वत ऐकोन । क्रोधें दारुण उचंबळत ॥२॥ यम युद्धाला निघाला : नेत्रा आरक्त करोन । आपुलें सैन्य पडिलें जाणोन ।सारथियासि म्हणे शीघ्र स्यंदन । आणीं युद्धा जावया ॥३॥सारथियानें आणिला दिव्य रथ । वरी आरुढला प्रेतराज रणपंडित ।त्या रथाच्या घडघडाटश्रवणांत । दिग्गजांची टाळीं बैसलीं ॥४॥हातीं घेतला मुद्गर । मृत्यसारिखा तो उग्र ।काळदंड घेवोनि कठोर । जानों संहार करील ब्रह्मांडाचा ॥५॥ऐसा तो विवस्वतात्मज । रथीं आरुढला वीरराज ।परिवेष्टित