रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 25

  • 2.5k
  • 735

अध्याय 25 यमाच्या सैन्याचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ नारदांचे यमलोकी आगमन : ऐसें विचारोनि ब्रह्मकुमर । प्रेतपुरीस आला सत्वर ।जेथे प्रेतराज सहपरिवार । परिवेष्टित बैसलासे ॥१॥नारदें यम देखिला । जैसा हुताशन प्रज्वळिला ।आपण मध्यें मिरवला । खमंडळीं कश्यपसुत ॥२॥प्राणियांचें जैसें कर्म देखे । तयां दंड करी कर्मासारिखे ।ऐसें करितां आकस्मात देखे । पातला विरंचिसुत नारद ॥३॥आला देखोनि नारदमुनी । यमराव हरिखेला मनीं ।षोडशोपचारीं पूजनी । मधुरवाणी बोलिला ॥४॥अहो जी मुनिचक्रचूडामणी । क्षेम असे तुम्हांलागोनी ।स्वधर्म रक्षितसा अनुदिनीं । किंप्रयोजनीं आगमन ॥५॥सकळ सुर आणि सुरपती । देव गंधर्व ऋषिपंक्ती ।आणि असुरही सेविती । तो तूं आलासि कोणें अर्थी ॥६॥कोणा कार्याचे