रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 22

  • 2.5k
  • 795

अध्याय 22 रावणाची सुटका ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची दुर्दशा : माहिष्मतीनामें नगरी । तेथें सहस्त्रार्जुन राज्य करी ।तयाचे बंदीं श्रीराघवारी । कित्येक दिवस पडियेला ॥१॥श्वानावाणी शूकरावाणी । जाई मार्गे खरावाणी ।दाही शिरीं वाहे पाणी । अनालागोनी रावण ॥२॥ऐसा कित्येक दिवसपर्यंत । माहिष्मतीनगरी भीक मागत ।विसांहातीं कांती सूत । उदरार्थ दशानन ॥३॥तंव येरीकडे प्रहस्त प्रधान । पौलस्तिमुनीसी स्वर्गीं जाऊन ।सांगितलें स्वामी रावणालागून । सहस्त्रार्जुने बंधन केलें ॥४॥माहिष्मतीनगराआंत । रावण असे भीक मागत ।नगराबाहेर येवों नेदित । कोंडोनि तेथ राखिला ॥५॥ रावणाचा पिता माहिष्मतीला निघाला : ऐकोनि रावणासि बंधन । कोपें खवळला ब्रह्मनंदन ।पुत्रस्नेहें कळवळोन । वायुवेगें चालिला ॥६॥मनोवेग सांडोनि मागें