रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 21

  • 2.3k
  • 762

अध्याय 21 सहस्रार्जुनाने रावणाला बांधून नेले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रम्य नर्मदेचा तीरीं । राक्षसेंद्र पंचद्वयशिरी ।पूष्पोपहारें अर्चिता त्रिपुरारी । काय तेथें वर्तलें ॥ १ ॥येरीकडे सहस्रार्जुन भूपाळ । महिष्मतीचा नृपशार्दूळ ।श्रीरेवेमाजि स्त्रियांसहित केवळ । क्रीडा जळीं करीत होता ॥ २ ॥स्त्रियांसहित अर्जुन । क्रीडतसे आनंदें पूर्ण ।सहस्रहस्तीनींसीं एकला जाण । ऐरावती खेळे जैसा ॥ ३ ॥ सहस्राजुनाने क्रीडेच्या वेळी आपल्या बाहूंनी नर्मदाअडविल्यामुळे तिचे पाणी सर्वत्र पसरून रावणाची शिवपूजा मोडली : जाणावया भुजबळाची थोरी । स्वभुजा पसरोनि भीतरीं ।अवरोधूनि रेवातीरीं । स्तब्धता झाली ते काळीं ॥४॥सहस्त्रबाहूंच्या बळीं । नर्मदा रोधन झालें ।समुद्रासारिखी ते काळीं । चढती झाली उदकेसीं ॥५॥देखोनियां आत्मजातें