रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 15

  • 2.3k
  • 789

अध्याय 15 कुबेराचा पराभव ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतर अवनिजापती । प्रीतीं सांगतसे अगस्ती।म्हणे स्वामी ब्रह्मंडाच्या पंक्ती । उतरिसी रचिसी हेळामात्रें ॥१॥तूं ईश्वराचा ईश्वर । तू सुरवरांचा आदिइंद्र।तूंचि नटनाट्यलीलावतार । दावितोसी विनोदें ॥२॥तूंचि प्रकृति आणि पुरुष । तूं ब्रह्मादिकांचा ईश ।तूं अवतार अयोध्याधीश । तूं कथा आम्हांला पुसतोसी ॥३॥आमच वाढवोनि मान ।आम्हंप्रती करितोसि प्रश्न ।हेंचि आम्हं थोर भूशण । तूं परब्रह्म वंदिसी॥४॥आतां अवधारीं धरणिजारमणा । यक्षेसीं संग्राम करतां रावणा ।रक्षोगण आणिले रणांगणा। मग रावणा कय झालें॥५॥द्वारपाळें तोरणावरी । झोडिलां रावणा पळे दूरी ।तदनंतरे श्रीरामा अवधारीं । कथेचिया निरुपणा ॥६॥यक्षगण मोडिले रणीं । शतसहस्त्र पाडिले मेदिनीं ।धनाघक्षें देखोनि नयनीं। आपण संग्रामा