रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 6

  • 2.5k
  • 822

अध्याय 6 राक्षस व विष्णूचे युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इल्वलारी म्हणे जामदाग्निजिता । कमलोद्भवजनका ऐकें पूर्वकथा ।वर देता तयांसी सृष्टीकर्ता । त्यासही तत्वतां न गणिती ॥१॥वरदें उन्मत्त होवोन । करिते झाले अन्योन्य ।ऋषींस दुःख देऊन । यागविध्वंसन पैं करिती ॥२॥ राक्षसांच्या उन्मत्तपणामुळे त्रस्त होऊनऋषिमंडळी शंकराकडे आली, शंकराची प्रार्थना : ऐसे राक्षसभयेंकरीं । विप्रीं कडे कुमर हातीं क्कारी ।यज्ञपात्रें स्त्रियांचे शिरीं । कैलासपुरी ठाकिली ॥३॥आले वृद्ध थोर थोर । सपत्नीक अपत्नीक विधुर ।तपें जर्जर झाले शरीर । ब्रह्मचारी थोर तेथें आले ॥४॥आले मौनी दिगंबर । माथां जटा वल्कलांबर ।तपोधन थोर थोर । भगवी कापडी येते झाले ॥५॥राक्षसभयेंकरोनि ऋषी । येते