रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 71

  • 3.1k
  • 978

अध्याय 71 त्रिजटेचे दर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रतिगृह्णिष्व तत्सर्वं मदनुग्रहकांक्षया ।मुनिवेष्ठं समुत्सृज्य राज्यार्थमनुभूयताम् ॥ १ ॥एवमुक्तस्तु काकुत्स्थः प्रत्युवाच बिभीषणम् ।धर्मज्ञं धर्मविद्वाक्य ज्यायज्ञो न्यायकोविदम् ॥ २ ॥ लोटांगणीं बिभीषणें । विचित्रालंकार भूषणें ।विचित्र रत्‍नें विचित्र वसने । आणिलीं आपण पूजेसीं ॥ १ ॥विचित्र पूजेची सामग्री । घेवानि बिभीषण विनंतीकरी ।सहित जानकी सुंदरी । पूजा अंगीकारीं मत्प्रीतीं ॥ २ ॥मजवरी अनुग्रह पूर्ण । त्याचें फळ हेंचि जाण ।यथासामर्थ्यें पूजाविधान । आणिलें प्रीतीने अंगीकारीं ॥ ३ ॥सांडोनि मुनिवेषासी । अंगीकारीं राजचिन्हांसी ।जेणें सुख होय आम्हांसी । तें प्रीतीसीं आचरावे ॥ ४ ॥निजभक्ताचें मनोगत । संरक्षावें यथातथ्य ।हेंचि तुझें निजव्रत । तें साद्यंत