रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 70

  • 3.2k
  • 993

अध्याय 70 देवभक्तांची आनंदस्थिती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामें विनवितां दशरथ । निश्चियें बाणला वचनार्थ ।स्वयें मानोनि कृतार्थ । जाला विरक्त सर्वस्वा ॥ १ ॥राज्यलोभ स्वर्गलोभ । पुत्रलोभ विषयलोभ ।सांडूनि भुवनभोगलोभ । जाला निर्लोभ दशरथ ॥ २ ॥अहंता आणि ममता । लोकलोकांतरवार्ता ।गमनागमन पै तत्वता । राया दशरथा पैं नाठवे ॥ ३ ॥नामरूपातीत । वर्णाश्रमधर्मातीत ।जातिकुळगोत्रातीत । स्वयें रघुनाथ जाणितला ॥४ ॥श्रुति शास्त्रातीत । पूर्ण ब्रह्म रघुनाथ ।राये करितांचि इत्यर्थ । स्वयें तो अर्थ ठसावला ॥ ५ ॥लक्षूं जातां गुणातीतता । स्वयें ठसावे ते अवस्था ।लाभे आपुली निजमुक्तता । गुणातीतता गुणांमाजी ॥ ६ ॥यालागीं मुमुक्षु सकळ । साधक जिज्ञासु प्रबळ