रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 62

  • 4.7k
  • 984

अध्याय 62 रावणाचा शिरच्छेद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची स्थिती व श्रीरामस्वरुपावलोकन : सोहंभावाचा मेढा सुलक्षण । अनुसंधानाचा तीक्ष्ण बाण ।लक्षूनियां रघुनंदन । स्वयें रावण विंधो पाहे ॥ १ ॥तंव अवघा ब्रह्मांडगोळ । रामें व्यापिला दिसे सकळ ।तेथें कायसें जगतीतळ । रामें प्रबळ वाढिन्नला ॥ २ ॥सत्पपाताळातळीं चरण । श्रीरामाचे देखे रावण ।ऐका तयाचें लक्षण । सुलक्षण सुचिन्हीं ॥ ३ ॥निजधैर्यशेषफडीवरी । श्रीरामचरण निर्धारीं ।सुचिन्हें शोभती कवणेपरी । नवलपरी तेथींची ॥ ४ ॥अनुपम चरणपंकज । शोभे सायुज्याचा ध्वज ।उर्ध्वरेखा ते सहज । दावी वोज उर्ध्वगतीची ॥ ५ ॥वज्र आणि अंकुश दोन्ही । भक्तसाह्यालागोनी ।विपक्षीं अंकुश ओढोनी । भक्तरक्षणीं छेदी वज्रें