रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 48

  • 3.4k
  • 1.1k

अध्याय 48 श्रीरामांच्या क्रोधाचे शमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरतास वंदन करुन हनुमंताचे वृत्तांत-कथन : देखोनि भरतप्रेमासी । नमन करोनि वेगेंसीं ।सांगावया रामकथेसी । प्रेम कपीसीं अनिवार ॥ १ ॥आम्हां निश्चयमनें । स्वयें राम अनुभवणें ।जगीं रामरुप देखणें । भरतोल्लंघन केंवी घडे ॥ २ ॥बंधु धाकटा रामाचा । तोही आम्हां राम साचा ।केंवी उल्लंघूं याची वाचा । लावीन कथेचा अन्वय ॥ ३ ॥भरता ऐकें सावधान । चित्रकुटीं रघुनंदन ।देवोनि तुम्हांसी समाधान । पुढारें गमन मांडिलें ॥ ४ ॥घेवोनि अगस्तीची भेटी । सांगोनियां गुह्य गोष्टी ।शरभंगऋषि जगजेठी । उठाउठीं उद्धरिला ॥ ५ ॥विराध येवोनि आडवा । सीता उचलोनि निघे तेधवां ।रामें