रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 28

  • 3k
  • 1.1k

अध्याय 28 कुंभकर्णवध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्वतःची विद्रुपता समजल्यावर कुंभकर्णाचा खेद व संताप : कुंभकर्णा लावोनि ख्याती । सुग्रीव पावोनि विजयवृत्ती ।स्वयें आला श्रीरामाप्रती । वानर गर्जती उल्लासे ॥ १ ॥येरीकडे कुंभकर्ण । विजयोल्लासें आपण ।लंकेसीं जातसे जाण । दशानन वंदावया ॥ २ ॥हांसती लंकेचे जन । हारवोनियां नाक कान ।विजय मिरवितो आपण । काळें वदन कुंभकर्णा ॥ ३ ॥कुंभकर्ण अति उन्मत्त । नाककानां झाला घात ।कोणी सांगों न शके मात । तेणें लंकानाथ अति दुःखी ॥ ४ ॥शत्रु मर्दिल कुंभकर्ण । ऐसा भरंवसा होता पूर्ण ।शेखीं हरवोनि नाककान । आला आपण फेंपात ॥ ५ ॥सुग्रीवें छेदिले नाककान ।