रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 8

  • 2.7k
  • 1.2k

अध्याय 8 अंगद – शिष्टाई वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची दुर्दशा : मागिले प्रसंगीं जाण । वामनें गांजिला रावण ।तिज्या रावणाचें प्रकरण । सांगें आपण अंगद ॥ १ ॥पूर्वप्रसंगीं स्वभावतां । जाली दों रावणांची कथा ।तिज्या रावणाची प्रौढता । ऐक तत्वता लंकेशा ॥ २ ॥परिसतां अंगदवचन । रावणा हृदयीं खोंचती बाण ।कांही न चले आंगवण । ऐके आपण कुसमुसित ॥ ३ ॥ श्वेतद्विपातील फाजिती : एक रावण मूर्खावेशीं । स्वयें निधाला श्वेतद्वपासी ।तेथें गति न चले विमानासीं । सेवकांसीं अगम्य ॥ ४ ॥मागे सांडोनि विमान । राहवोनियां सेवकजन ।एकला निघे रावण । मूर्खाभिमान । आक्रोशीं ॥ ५ ॥श्वेतद्विपीचें राज्य