रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 39

  • 3.2k
  • 1.1k

अध्याय 39 सागराची श्रीरामांना शरणागती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणास लंकादान दिल्यावर सर्वांना परमानंद : बिभीषणासी लंकादान । देवोनियां श्रीरघुनंदन ।सभा बैसली सावधान । सुप्रसन्न स्वानंदें ॥ १ ॥वानर करिती गदारोळ । बिभीषणासी सुखकल्लोळ ।सुग्रीवा उल्लास प्रबळ । सकळ दळ देखोनि ॥ २ ॥वानरांचे महाभार । करूं येती नमस्कार ।श्रीरामनामाचा गजर । देती भुभुःकार आल्हादें ॥ ३ ॥ हनुमान व सुग्रीव समुद्र पार करण्याच्या विचारात : तेथें येवोनि हनुमंत । सुग्रीवासी करी एकांत ।सीता सोडावयाचा मुख्यार्थ । लंकानाथ वधावया ॥ ४ ॥समुद्राचिये तीरीं । बैसल्या वानरांच्या हारी ।कैसेनि जाववेल पैलपारीं । ते विचारीं कपिनाथ ॥ ५ ॥नद्द्या पर्जन्यें भरोनि येति