रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 34

  • 3.3k
  • 1.2k

अध्याय 34 श्रीरामांचे समुद्रतीरावर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकेतील हनुमंताच्या विक्रमाचे सिंहावलोकन ब्रह्मा म्हणे ब्रह्मलिखितीं । कपीची लिहिली अल्पकीर्ती ।त्याहून अगाध हनुमंताची ख्याती । किर्ती किती लिहावी ॥ १ ॥श्रीरामा तुझें हें वानर । लंके आलें पालेखाइर ।त्याची कीर्ति अति दुर्धर । मज साचार लिहवेना ॥ २ ॥अठरा लक्ष दीपिका पूर्ण । कपीनें पुच्छें विझवोन ।रावणसभा करोनि नग्न । दशानन गांजिला ॥ ३ ॥रिघोन रावण शयनस्थाना । परिसोनि मंदोदरीचें स्वप्ना ।सीता शुद्धी आणी मना । अशोकवना कपि आला ॥ ४ ॥देवोनियां श्रीराममुद्रा । सुखी करोनि सीता सुंदरा ।गांजावया राक्षसेंद्रा । केला तरूवरा नवभंग ॥ ५ ॥मारिलें वनकरां किंकरां ।