रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 5

  • 3.4k
  • 1.3k

अध्याय 5 मारूतीला अशोकवनात सीतेचे दर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचा शांतिहोम : विघ्नदेखिलें सभेआंत । रावण होम क्री शांत्यर्थ ।मंदोदरी सेजे गुप्त । देखे हनुमंत एकाकी ॥ १ ॥ मंदोदरीलाच सीता समजून हनुमंताचे विचार व मनोविकार : ही निश्चयें होय सीता । ऐसें मानलें हनुमंता ।तेचि अवधारा पैं कथा । श्लोकीं श्लोकार्थ अवधारिजे ॥ २ ॥विमानीं उपराउपरीं । शोधितां एकांत ओवरी ।रावणाचे सेजेवरी । मंदोदरी देखिली ॥ ३ ॥ठाण माण गुणलक्षण । रूपरेखा स्थान यौवन ।सीतेसारखी समसमान । दोघी अनुपम्य स्वरूपें ॥ ४ ॥हेचि श्रीरामाची कांता । हेचि माझी स्वामिनी सीता ।ऐसे मानिलें हनुमंता । उल्लासतां नाचत ॥ ५