निर्णय भाग ९मागील भागावरून पुढे...शुभांगी मंगेशच्या पसंतीस उतरल्यामुळे पुढचं सगळं काम सोपं झालं. यथावकाश साखरपुडा झाला.साखरपुडा थोडक्यात झाला. साखरपुड्या आधी इंदिरेने काही गोष्टी स्पष्ट केल्या," साखरपुड्याच्या वेळी मुलाला आणि मुलीला फक्त कपडे करायचे.बाकी सगळं देणंघेणं लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रीमंत पूजनाला होतच म्हणून ते सगळं आत्ता साखरपुड्याला करायचं नाही.दुसरं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आहेर द्या आम्ही आमच्या नातेवाईकांना आहेर देऊ.तुमच्या मुलीला तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या. मुलाकडचे म्हणून काही मागणार नाही. आम्हाला आमच्या सुनेला जे करायचंय ते करु."इंदिरा हे सगळं एका दमात बोलून गेली.मंगेश तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला.लग्नासारख्या महत्वाच्या कार्याची बोलणी इंदिरानी अचानकपणे आणि झटक्यात केली." हो चालेल.तुम्ही म्हणाल तसं