खेळ- जीवन -मरणाचा आघात शेवटचा सुलेमानच्या चमन पॅलेस वरून दोन चिलखती जीप्स बाहेर पडल्या. दोन्ही जीपमध्ये मिळून एकून बारा माणसं होती. सारे तडीपार गुंड होते.मशिनगन ...तलवारी अस साहित्य घेवून पहाटेच बाहेर पडले होते.अजून उजाडले नव्हते. हा सारा लवाजमा दोन नंबरच्या टेकडीकडे चालला होता. पाचजणांना बेसावध ठेवून घेरायच अशी त्यांची रणनीती होती.पण पीटरने अर्धवट झोपेतही वाहनांचा आवाज टिपला. " ऊठा..ऊठा .. ,गाड्यांच्या आवाज येतोय..खडकाळ.. वाटेवरुन येताना थोडा वेळ लागेल....तोपर्यंत आपण तयारी करूया.." सारे धडपडून उठले.डोळे चोळतच शायनाने तीर- कामठा हाती घेतला व उडी मारतच ती उभी राहीली. " ईलियास तू टेकडीची उत्तर दिशा पकड ..शिवा तू दक्षिणेकडे जा मी पूर्व दिशा