राग

  • 10.8k
  • 1
  • 3.8k

राग काही दिवसांपासून सचिन एकाकी पडून अस्वस्थ झाला होता.त्याचे जवळचे मित्रही त्याच्याशी अंतर ठेवून वागू लागले होते. कालच त्याचे व त्याच्या पत्नीचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. ती भांडण करून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तर तो आणखीनच एकाकी पडला होता. तसा तो खूप सज्जन व लोकांना संकट समयी मदत करणारा, प्रत्येक व्यक्तीच्या सुख-दु:खात सहभागी होणारा खूप प्रेमळ व्यक्ती होता. इतरांना दु:ख झालं तर तो हळहळ व्यक्त करायचा. पण त्याच्या रागामुळे त्याने केलेले प्रेम, त्याने इतरांना केलेली मदत निष्फळ व्हायची. काल त्याच्या पत्नीने त्याचा आवडता शर्ट प्रेस करून न