दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण १२)

  • 10.5k
  • 5.1k

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण १२“ फेर तपासणी मधे काही विचारायचे आहे ? ” न्यायाधीशांनी दैविक दयाळ कडे बघून विचारले.“ नाही विचारायचे काही.माझा पुढचा साक्षीदार आहे ओमकार केसवड ” दैविक दयाळ म्हणाला.ओमकार केसवड हा चाळीशीच्या घरातील , एक तरतरीत आणि सावध असा वाटणारा रुंद खांदे असणारा माणूस होता,त्याने शप्पथ घेतल्यावर दैविक ने त्याचा ताबा घेतला.त्याने साक्षीत सांगितले की ज्या जागेत खून झाला त्या पासून दोन किलोमीटर अंतरावर एका भाड्याच्या घरात तो राहतो.तो माळीकाम, आणि इतर झाडलोटीची कामे करत असे.एका जुनाट आणि पुरातन अशा गाडीतून तो ये जा करत असे.त्याला विशिष्ट अशी कामाची वेळ दिली गेली नव्हती पण कधी कधी तो