अंतःपुर - 10

(18)
  • 11.2k
  • 5.5k

१०. पुनर्जीवन (रि-लाईफ)...दसरा चौकपासून सुमारे एकशे सत्तर मीटर दक्षिणेला असलेल्या सीपीआरला मिनिटभराच्या अंतराने जतीनची गाडी लागली. त्याने कुणाला न बोलावता, स्ट्रेचरची वाट न बघता मिहीरला हातात उचललं आणि तो सीपीआरच्या मुख्यव्दाराकडे धावला...तो आत आला. एक डॉक्टर त्याला दिसला. त्याने हाक मारली,"डॉक्टर!"डॉक्टर मिहीरला मूर्च्छित पाहून तो लगेच जतीनकडे आला. "काय झालंय!" डॉक्टरने मिहीरकडे न पाहता जतीनला विचारलं."गोळी लागली आहे!""ही तर पोलीस केस आहे..." डॉक्टर हात वर करण्याच्या इराद्यात होता..."ह्यो स्वतः पोलीस आहे! लवकर ट्रीटमेंट चालू करा!" जतीन ओरडला."ठीक आहे ठीक आहे." डॉक्टर गडबडला.त्याने कम्पाऊंडर्सना हाक दिली. कम्पाऊंडर्सना पण तत्परतेने धावत आले."यांना ओटीमध्ये घ्या!" डॉक्टर तसदीने बोलला. कम्पाऊंडर्सनी पण इमर्जन्सी लक्षात घेऊन स्ट्रेचरची औपचारिकता