घुंगरू - 5

(12)
  • 8.9k
  • 2
  • 3.5k

#@घुंगरू@#भाग 5सौ. वनिता स. भोगील,, मालती माळावरून आली ती खूप आनंदात दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघून बापू म्हणाले, बघ माई तू उगच काळजी करत होतीस.... बघ मालू किती खुश हाय पर तुझं आपल काय बी आसत..... बापू बाहेर निघून गेले, मालती तयारीला लागली.. . मुहूर्ताचा दिवस उजाडला, सकाळ पासूनच घाई गडबड चालू होती, सगळ सजवण्यात शेजारच्या बायका मदतीला बोलवल्या होत्या माईन....... थोड्याच वेळात दारातून जोरजोरात बोलल्याचा आवाज येऊ लागला, माई कोण बोलत आहे हे बघायला दाराकडे गेल्या...... दारात भरजरी चमकणाऱ्या कपड्यात सहा सात किन्नर होते, हासत च आत आले , टाळ्यांचा आवाज जोरात करत मालतीला हाका मारू लागले, माई